*नारकर वाचनालय पाचलमध्ये सामूहिक पुस्तक वाचन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नारकर वाचनालय पाचलमध्ये सामूहिक पुस्तक वाचन*
*नारकर वाचनालय पाचलमध्ये सामूहिक पुस्तक वाचन*
राजापूर(प्रतिनीधी):-कै.ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचल येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत पुस्तकांचे सामुहिक वाचन करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ट महाविद्यालय पाचलच्या विद्यार्थिनिंनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. नारकर वाचनालयाचे ग्रंथपाल विठोबा चव्हाण यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. नारकर वाचनालयामध्ये असलेल्या समृद्ध ग्रंथसंपदेचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले. तसेच वाचनालयात असलेल्या स्पर्धा परीक्षा विषयीच्या पुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांनी अवश्य करावा असे आवाहन वाचनालयाचे कार्यवाह व माजी केंद्रप्रमुख विनायक खानविलकर यांनी केले. यावेळी ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध विषयावरील पुस्तके वाचण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांचे स्वागत ग्रंथपाल विठोबा चव्हाण यांनी केले तर आभार लिपिक साक्षी सुतार यांनी मानले.