*ल.र.हातणकर यांच्या स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे आ. किरण सामंत यांचे अ.म. कुणबी सेवा संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ल.र.हातणकर यांच्या स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे आ. किरण सामंत यांचे अ.म. कुणबी सेवा संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन*
*ल.र.हातणकर यांच्या स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे आ. किरण सामंत यांचे अ.म. कुणबी सेवा संघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन*
राजापूर(प्रतिनीधी):-माजी आमदार, माजी मंत्री ल.र. हातणकर राजापूर 66 हायवे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला रत्नागिरी जिल्हा येथे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे पण या संदर्भात आपण त्वरित माहिती घेऊन जागे संदर्भात आपणास कळवितो आणि स्मारकाचे काम मार्गी लावतो असे आश्वासन राजापूर, लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघाच्या शिष्टमंडळाला दिले. कुणबी सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष रवी बावकर, संकेत ठिक, रविंद्र मटकर, संतोष चौगुले, विश्वास राघव यांनी आमदार सामंत यांची भेट घेऊन स्मारका संदर्भात चर्चा केली तेव्हा त्यांनी जागे संदर्भात लगेचच माहिती घेऊन आपणास कळवितो आणि स्मारकाचे काम लवकर मार्गी लावणार असे आश्वासित केले, असल्याचे रवी बावकर यांनी सांगितले.