*नंदुरबारच्या ईदगाह फायर बट परिसरात गोळीबार सरावासाठी प्रवेशबंदी,15 ते 31 जानेवारी पर्यंत सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल प्रतिबंध*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारच्या ईदगाह फायर बट परिसरात गोळीबार सरावासाठी प्रवेशबंदी,15 ते 31 जानेवारी पर्यंत सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल प्रतिबंध*
*नंदुरबारच्या ईदगाह फायर बट परिसरात गोळीबार सरावासाठी प्रवेशबंदी,15 ते 31 जानेवारी पर्यंत सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल प्रतिबंध*
नंदुरबार(प्रतिनिधि):-गोळीबार सरावासाठी नंदुरबार शहरातील ईदगाह फायर बट परिसरात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 (BNSS) अंतर्गत कलम 163 (2) व (3) नुसार आदेश जारी करत, 15 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवेशबंदी लागू केली आहे. वार्षिक गोळीबार सराव कार्यक्रम सुरक्षिततेने पार पाडण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या आदेशात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नमूद केले आहे.
आदेश लागू करण्याचे कारण, सुरक्षा सुनिश्चित करणे, गोळीबार सरावादरम्यान नागरिकांची सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू करण्यात आला आहे. दुर्घटना टाळणे,
परिसरात संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळण्यासाठी कडक प्रतिबंध लागू करण्यात आला आहे. नियंत्रण व समन्वय, पोलीस प्रशासन व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) यांना सरावाच्या कालावधीत परिसर सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवेशबंदीच्या अटी, प्रतिबंधित क्षेत्र,
फायर बट परिसरात केवळ सरावासाठी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षक यांनाच परवानगी असेल. सर्वसामान्य नागरिकांना बंदी, अन्य कोणत्याही व्यक्तींना या कालावधीत परिसरात प्रवेश करता येणार नाही.
जबाबदारी, स्थानिक पोलीस प्रशासन व CISF यांनी परिसरात 24x7 सुरक्षा सुनिश्चित करावी, नागरिकांना आवाहन, सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे व गोळीबार सरावादरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे. युनिटनिहाय गोळीबार सरावाचा कार्यक्रम,
खालीलप्रमाणे विविध युनिट्ससाठी सरावाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. के.औ. सु.ब. इकाई, ओएनजीसी, हजीरा, सुरत (गुजरात),
कालावधी,15 जानेवारी 2025 ते 16 जानेवारी 2025 एकूण दिवस, 2, के. औ.सु.ब. युनिट, UTPS उकाई, तापी (गुजरात), कालावधी, 17 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025
एकूण दिवस 3, के.
औ.सु.ब. इकाई, एएसजी, सुरत (गुजरात), कालावधी, 20 जानेवारी 2025 ते 21 जानेवारी 2025
एकूण दिवस, 2, के. औ.सु.ब. इकाई, केजीपीपी, कवास, सुरत (गुजरात),
कालावधी, 30 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025, एकूण दिवस 2