*नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित, साधना विद्यालय येथे युवा दिवस व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित, साधना विद्यालय येथे युवा दिवस व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न*
*नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित, साधना विद्यालय येथे युवा दिवस व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपन्न*
नंदुरबार(प्रतिनीधी):-साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती हा कार्यक्रम संयुक्तरीत्या मोठ्या उत्साहाने, मोठया विद्यार्थी सहभागाने आणि मोठ्या जोशाने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय कुंदन पाटील यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला आयोजीत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांची हुबेहूब प्रतिमा परिधान केलेले विद्यार्थ्यांकडून व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्याकडून सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळेस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागाने वेशभूषा परिधान करून राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे हुबेहूब जिवंत देखावे सादर केले.
विद्यार्थ्यांनी भाषण, नृत्य, गीत व नाटिका याने व्यासपीठ गाजवले .वकृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, नाटिका स्पर्धा व गायन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये आपले वकृत्व स्पर्धेत भाषण दिले. त्यानंतर विविध गीत सादर करून आनंद घेतला. त्यानंतर नृत्य, नाटिका एकांकिका, ग्रुप नाटिका असे विविध कार्यक्रम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम दाखवले. यामध्ये विद्यार्थ्यांनी वेशभूषा कडे विशेष लक्ष दिले. महाराष्ट्राची संस्कृती, भारताची संस्कृती, राजमाता जिजाऊंनी दिलेला अभ्यास आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य व त्यांच्या ध्येय आणि स्वामी विवेकानंद यांनी धर्मासाठी व भारतीय संस्कृतीसाठी केलेले विशेष कार्य या सर्वांचा जिवंत देखावा दाखवत आपल्या वकृत्वामध्ये नृत्यांमध्ये नाटिकांमध्ये आणि भाषणामध्ये संपूर्ण जीवनक्रम सर्वांसमोर विद्यार्थ्यांनी सादर केला. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुंदन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणांमधून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी जे गिरासे प्रस्ताविका पि यु आव्हाड व विजय प्रधान यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन आर के गाभणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख किरण मोरे व सर्व सहकारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.