*शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत-जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत-जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचे आवाहन*
*शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत-जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनीधी):-राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, छायाचित्रण, दूरचित्रवाणी वृत्तकथा, समाज माध्यमातील योगदान तसेच स्वच्छता अभियानासाठी जनजागृतीपर लेखनासाठी 2024 साठीची पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित किंवा प्रसारित झालेल्या लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा, आणि इतर प्रकारांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. इच्छुक स्पर्धकांनी 31 जानेवारी 2025 पर्यंत प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी केले आहे. जिल्ह्यातील स्पर्धकांनी अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in, maharashtra.gov.in आणि mahasamvad.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. सदर अर्ज डाऊनलोड करून परिपूर्ण असलेले पुरस्कारांचे प्रस्ताव जिल्हा माहिती कार्यालय, 206 नवीन प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे अर्ज सादर करावेत.
असे आहेत पुरस्कार व स्वरुप.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत, अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय), ₹1,00,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर), ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर), ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र. यशवंतराव चव्हाण शासकीय गट पुरस्कार (मराठी), ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार,₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार (शासकीय गट), ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, समाज माध्यम पुरस्कार, ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार, ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
विभागीय पुरस्कार व स्वरुप, प्रत्येक विभागासाठी विशेष विभागीय पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे, दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र या व्यतिरिक्त ₹ 10 हजार दैनिक गांवकरीने पुरस्कृत केले आहेत, अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद व लातूर विभाग) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, आचार्य अत्रे पुरस्कार (मुंबई विभाग) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे विभाग) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, शि. म. परांजपे पुरस्कार (कोकण विभाग) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, ग. गो. जाधव पुरस्कार (कोल्हापूर विभाग)₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, लोकनायक बापूजी अणे पुरस्कार (अमरावती विभाग) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) ₹51,000 (रोख), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र अधिकाधिक पत्रकारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी आपल्या प्रवेशिका वेळेत सादर कराव्यात, असेही आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राजपूत यांनी केले आहे.