*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार येथे 8 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्याबाबत जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता, त्या अनुषंघाने 13 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या शिष्टमंडळा बैठक घेतली व खालील विषयावर चर्चा करण्यात आली
त्यात अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी 7:30 ते 12:30 पर्यंत वेळ करणे बाबत आज चर्चा करण्यात आली यां बाबत अंगणवाडी कर्मचारी यांनी अंगणवाडी केंद्राची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 2:30 पर्यंत करणे बाबत सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी प्रकल्प कार्यालयांला स्वतः अर्ज करावा असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले, वेळ बदली करणे बाबत आदेश हा आयुक्त कार्यालयांचा आहे असे सांगितले. लवकरच मंत्रालय येथे नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंदोलन करण्यात येईल असे आव्हान संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांनी अंगणवाडी सेविकांना केलेले आहे, तात्पुरता स्वरूपात अंगणवाडी केंद्र सकाळी 9:30 ते 4 पर्यंत सुरू ठेवावे. लवकरच आंदोलनाची तारीख ठरविण्यात येईल असे सांगण्यात आले, यावेळी
कार्याध्यक्ष युवराज बैसाने, संघटक सचिव राजू पाटील , अमोल बैसाने, वकील पाटील आदी उपस्थित होते.