*डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
चिपळूण(प्रतिनीधी):-कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी 'ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन' कार्यक्रम उत्साह संपन्न झाला. ग्रंथदिंडीचे उद्धाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ही दिंडी महाविद्यालयाच्या प्रांगणातून ढोक्रावली फाटा पर्यंत काढण्यात आली. त्यानंतर 'ग्रंथ प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे बुकलँड चिपळूणचे संस्थापक दिपक महाडिक व बुकलँडच्या संचालिका सुनीता महाडिक उपस्थित होत्या. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखीलजी चोरगे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेच्या संचालिका व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे मॅडम उपस्थित होत्या. संस्थचे संचालक सुरेश खापले, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य नारायण पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन तांबेकर, निवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिंदे सर तसेच घटक महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिपक महाडिक यांनी 'महत्त्व वाचन संस्कृतीचे' या विषयवार मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विविध दाखले देत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले, वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र मिळतो. वाचन माणसाला माणूस बनवतं. जीवनातील एक नवी दिशा देते, विचार करायला शिकवते, अंतर्मुख करते. त्याचप्रमाणे जीवनात योग्य अयोग्य काय याची जाणीव करून देते हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. यानंतर बुकलॅंडच्या संचालिका सुनिता महाडिक यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी मोबाईलला मित्र बनविण्यापेक्षा पुस्तकांना आपला मित्र बनवा असा संदेश दिला. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निखिल चोरगे यांनी 'वाचाल तर वाचलं' या सुविचारामधून वाचनाचे महत्व पटवून दिले. आपल्या जीवनात वाचनाला खूप महत्त्व आहे. नेहमी येणारे वर्तमानपत्र, गोष्टीची पुस्तके, कादंबऱ्या, ग्रंथ, साप्ताहिके अशा अनेक माध्यमातून वाचन करू शकतो असे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिद्धि नाईक व प्रास्ताविक प्रा. श्वेता सकपाळ यांनी केले. प्रा. संदिप येलये आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.