*जिल्हा परिषद शाळेतील मानधनावरील शिक्षक यांची मानधन व शालार्थ आयडीसंदर्भात मागणीसाठी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा परिषद शाळेतील मानधनावरील शिक्षक यांची मानधन व शालार्थ आयडीसंदर्भात मागणीसाठी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*
*जिल्हा परिषद शाळेतील मानधनावरील शिक्षक यांची मानधन व शालार्थ आयडीसंदर्भात मागणीसाठी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*
अक्कलकुवा(प्रतिनीधी):-जिल्हा परिषद शाळेतील मानधनावरील शिक्षक यांची मानधन व शालार्थ आयडीसंदर्भात मागणीसाठी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार आपल्या अधिनस्त काम करणारे मानधनावरील शिक्षक आहोत. आमच्या कामाशी संबंधित काही अडचणी व मागण्या मानधन त्वरित देण्यात यावे,
आम्हाला मागील चार महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही, वेळेत मानधन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून, कृपया सर्व मानधनावरील शिक्षकांचे प्रलंबित मानधन त्वरीत वितरित करावे. शालार्थ आयडी देण्यात यावे, PAT गुणदान भरणे, हजेरी ऑनलाईन अरणे तसेच विविध ऑनलाईन शैक्षणिक कामे पार पाडण्यासाठी शालार्थ आयडीची आवश्कता भासत आहे. यासाठी सर्व मानधनावरील शिक्षकांना त्वरित शालार्थ आयडी प्रदान करण्यात यावे. वर नमूद केलेल्या मागण्यांवर त्वरित करर्यवाही करावी असे म्हंटले आहे. निवेदनावर जि.प. शाळेतील मानधन वरील शिक्षक जहांगीर वळवी, हितेश वळवी, रमेश वळवी, संजय वसावे, नितेश वसावे, दीपक गावित, आनंद वळवी, नीलिमा वसावे,प्रीतिशा गावित, मीनाक्षी कोकणी, रोशनी वसावे, माधवी पाडवी कल्पना वळवी, पूनम कोकणी, वसावे वर्षा, रजनिशा गावित, मनीष गावित, राजू गावित, ब्रमेश वसावे, मणीलाल गांगुर्डे, शीलवान गावित, दिलवरसिंग, वसावे, आनंद वळवी यांच्यासह जि्ह्यातील मानधन वरील शिक्षकांची आदींची स्वाक्षऱ्या आहेत.