*नंदुरबार शहर पोलिसांची नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई 6300 चा नायलॉन मांजा कारवाई जप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहर पोलिसांची नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई 6300 चा नायलॉन मांजा कारवाई जप्त*
*नंदुरबार शहर पोलिसांची नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई 6300 चा नायलॉन मांजा कारवाई जप्त*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार शहरात 9 जानेवारी 2025 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन, नंदुरबार शहरातील अमृत चौक परिसरातील, चिंतामणी कोल्ड्रिंक्स नावाच्या दुकानामध्ये, शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा बेकायदेशीररित्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली, सदर माहितीच्या अनुषंगाने नंदूरबार पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी लागलीच, गुन्हे शोध पथक व गोपनीय अंमलदार यांना बातमीची खात्री करुन कारवाई करणेसाठी रवाना केले, मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस पथकाने, नंदुरबार शहरातील अमृत चौक परिसरात चिंतामणी कोल्ड्रिंक्स नावाच्या दुकानात गेले असता, दुकानात बसलेला इसम हा पोलिसांना पाहून संशयितरित्या हालचाली करताना दिसून आल्याने, त्यास त्याचे नाव गाव विचारले, त्याने त्याचे नाव रमेश गंगाराम शिंपी वय 56 वर्ष अमृत टॉकीज जवळ नंदुरबार असे सांगितले, त्याच्या दुकानाची तपासणी केली असता, तेथे शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा मिळून आला, सदर रमेश गंगाराम शिंपी राहणार नंदुरबार हा त्याच्या दुकानात शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा, मानवी जिवीताचे व इतरांचे व्यक्तीगत सुरक्षिततेस धोका निर्माण होईल हे माहित असतांना देखील नायलॉन मांजा विक्री करण्याचे उददेशाने आपल्या कब्जात बाळगतांना मिळून आला आहे, त्याचे चिंतामणी कोल्ड्रिंक्स नावाच्या दुकान मधुन एकुण 6,300 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून, सदर मुद्देमाल लागलीच जप्त करण्यात आला आहे, वर नमूद आरोपी विरुद्ध पोकां/429 शैलेंद्र दंगल माळी यांनी फिर्याद दिल्याने आरोपीविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.31 /2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125, 223 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकॉ/1011 भटू धनगर, पोहेका /07 गोपाल चौधरी, पोना /1150 खुशाल माळी, पोशि/कल्पेश रामटेके, प्रवीण वसावे, राहुल पांढारकर, ललित गवळी, महिला पोलिस अंमलदार निंबाबाई वाघमोडे, रोहिणी धनगर अशांनी केली आहे.
"आगामी मकरसंक्रांत पतंगोत्सवात नागरीकांनी प्लॅस्टीक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासुन बनविलेल्या शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या धाग्याचा वापर करु नये. तसेच अशाप्रकारे नायलॉन मांजा विक्री व हाताळणी करतांना कोणी आढळुन आल्यास त्याबाबत तात्काळ जवळचे पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळवावे, त्याअन्वये संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे.