*पुणे सांगवी येथिल बाबुराव घोलप महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला उपक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुणे सांगवी येथिल बाबुराव घोलप महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला उपक्रम संपन्न*
*पुणे सांगवी येथिल बाबुराव घोलप महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला उपक्रम संपन्न*
पुणे(प्रतिनीधी):-वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये प्रसिद्ध लेखक तानाजी धरणे यांचा 'लेखक आपल्या भेटीला या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, आयक्युएसी समन्वयक डॉ. अर्जुन डोके, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अनिल लोंढे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा खोडदे, डॉ. विजय बालघरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नागेश भंडारी, प्रा. ज्ञानेश्वर जांभुळकर, प्रा. अनुपमा कदम, ग्रंथपाल डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. 'लेखक आपल्या भेटीला या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना प्रसिद्ध लेखक तानाजी धरणे यांनी लेखनशैलीच्या विविध वैशिष्ट्ये व पैलूंवर भाष्य करत समाजातील वेदना व संघर्ष आपल्या लेखनातून मांडता आले पाहिजे असे नमूद केले. तसेच आपला लेखनप्रवास उलगडत असताना आपल्या साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या हेलपाटा या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया स्पष्ट करत उपस्थितांना खिळवत ठेवले. आपल्या मनोगतात प्राचार्या डाॅ . संगीता जगताप यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये लेखनाची आवड जोपासत आपले अनुभव लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी विविध विभागातील सुमारे 120 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अतिथी परीचय डाॅ. अनिल लोंढे, प्रास्ताविक डाॅ विठ्ठल नाईकवाडी, सुत्रसंचालन डाॅ. विजय बालघरे तर आभार प्रदर्शन डाॅ नागेश भंडारी यांनी केले असून प्रणित यांनी विशेष तांञिक सहकार्य केले.