*लांजातील गांगेश्वर नमन मंडळ, कुरचुंब, सुवारेवाडीतील कलाकार "लोक कलागुण गौरव" पुस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लांजातील गांगेश्वर नमन मंडळ, कुरचुंब, सुवारेवाडीतील कलाकार "लोक कलागुण गौरव" पुस्काराने सन्मानित*
*लांजातील गांगेश्वर नमन मंडळ, कुरचुंब, सुवारेवाडीतील कलाकार "लोक कलागुण गौरव" पुस्काराने सन्मानित*
लांजा(प्रतिनीधी):-5 जानेवारी 2025 रोजी चिपळूण येथे लोक कला गुणगौरव पुरस्काराने विविध तालुक्यातील नमन कलाकारांना सन्मानित करण्यात आले.यावेळी आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आणि प्रसिद्ध अभिनेता ओंकार भोजने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला. गांगेश्वर नमन मंडळ, कुरचुंब, सुवारेवाडी नमनामधील कलाकार जगन्नाथ तानाजी सुवारे यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जगन्नाथ सुवारे यांनी नमनामध्ये हवालदार, लंकापती राजा रावण आणि इतर भूमिका करून आपल्या अभिनयाने प्रेक्षणांना आपल्या कलेचा आनंद दिला आहे. तसेच नमन, भजन, शक्ती-तुरा अश्या विविध कार्यक्रमात उत्कृष्ट गायन करत आहेत. हवालदार आणि लंकापती राजा रावण या भूमिकेतील पात्र प्रेक्षकांच्या खूप मोठ्या प्रमाणात पसंतीस आली. वरिष्ठ आणि सहकलाकार तुकाराम सुवारे, कै. सखाराम सुवारे, श्रीपत सुवारे, गोविद ता. सुवारे, कै. चद्रकांत सुवारे, सखाराम मांडवकर, अनिल सुवारे, सुरेश पाष्ठे, दिलीप सुवारे, मंगेश पाणकर, मनोहर सुवारे,कु. चद्रकांत पाष्ठे, कु. संदेश पाष्ठे आणि संदिप मांडवकर अश्या अनेक कलाकारांबरोबर नमनामध्ये काम केले आहे. जगन्नाथ सुवारे यांनी पुरस्कार स्वीकारताना "हा पुरस्कार माझा एकटयाचा नसून तो नमन मंडळाचा, गांगेश्वर देवाचा, कुरचुंब गावाचा आणि सुवारेवाडीचा आहे" असे भावनिक उदगार काढले.
पुरस्काराच्या वेळी गावाचे आणि वाडीचे तरुण नेतृत्व तानाजी तुकाराम सुवारे, विजय सुवारे (मुलगा), तेजस्विनी सुवारे (मुलगी), योगेश तरल (भाचा) तसेच सुवारेवाडीचे सदस्य दत्ताराम सुवारे, मनिष सुवारे, विष्णू पडवळ, सीताराम मांडवकर, राजू लाड, चद्रकांत सुवारे, कु.संदेश पाष्ठे आणि अन्य नातेवाईक मंडळी उपस्थितीत होते.