*मोकस येथील रेशन दुकानदारासह एकावर रास्त भाव दुकानातील धान्य, काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना आढळल्याने मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोकस येथील रेशन दुकानदारासह एकावर रास्त भाव दुकानातील धान्य, काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना आढळल्याने मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
*मोकस येथील रेशन दुकानदारासह एकावर रास्त भाव दुकानातील धान्य, काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना आढळल्याने मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
अक्कलकुवा(प्रतिनीधी):-अक्कलकुवा तालुक्यातील मोकस येथील रेशन दुकानदारासह एकावर रास्त भाव दुकानातील धान्य धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना आढळल्याने मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील मोकस येथील रास्त भाव दुकानातील 5 क्विंटल 50 किलो तांदूळ 16500 व 17 क्विंटल गहू 42 हजार 500 रुपये एकूण 59 हजार रुपयांच्या धान्य साठ्यासह 5 लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन असा एकूण 5 लाख 59 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास बोलेरो चार चाकी वाहन क्रमांक एम एच 04 सीडी 7626 मोकस गावाचे नाळाफळी भागातील वडफळी कडे जाणाऱ्या रोडवर गावकऱ्यांनी पकडून तहसीलदार विनायक घुमरे यांच्याकडे तक्रार केली होती तहसीलदारांच्या आदेशाने पुरवठा विभागाकडून याबाबत पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता तहसीलदार विनायक घुमरे यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षक गुलाब बागले यांनी 7 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात रेशन दुकानदार करमसिंग चांद्या वळवी व सुभाष रूपा वळवी या या दोन्ही आरोपीं विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 प्रमाणे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.
दरम्यान, परवानाधारक रास्त भाव दुकानदार करमसिंग चांद्या वळवी यांनी दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी तहसीलदार यांना निवडलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी मी घरी झोपलो असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास मोकस गावाजवळ क्रुझर वाहन क्रमांक जी जे 35 बी 6667 या वाहनातून भारत सरकार एससी एस सी मध्यप्रदेश शासन सिम्बॉल असलेला गहू व तांदुळाच्या गोण्या वाहून नेल्या जात असल्याने गावकऱ्यांनी पकडले होते सकाळी ते माझ्या मुलाच्या मालकीच्या बोलेरो वाहन क्रमांक एम एच 04 सीडी 7626 मध्ये जबरदस्ती भरण्यात येऊन खोटा पंचनामा करण्यात आला गावातील काही लोकांच्या संगनमताने मला या प्रकरणात गोवण्यात येत असून, मला अडचणीत आणण्याचा प्रकार केला जात आहे, हाय मिळालेले धान्य इतर कोणाचे असून त्याची चौकशी करण्यात यावी मोकस परिसर हा अतिदुर्गम भाग असल्याने या परिसरात नेहमीच नेटवर्कच्या अभाव असल्याने, पावत्या काढणे कठीण होत असते माझ्याकडे असलेला धान्यसाठा पूर्ण असून मी प्रत्येक शिधापत्रिका धारकास पूर्ण धान्य वाटप करतो, याबाबत पुरवठा निरीक्षक बागले यांना संबंधित पंचनामा करतेवेळी सांगूनही माझे काहीही ऐकून घेतले नाही. तरी याबाबत सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.