*13 जानेवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-विजय रिसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*13 जानेवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-विजय रिसे*
*13 जानेवारी रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-विजय रिसे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नामांकित उद्योजक नव-भारत फर्टिलायझर्स लि. नंदुरबार/धुळे, गोविंदा मानव संसाधन सेवा नाशिक, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शाखा नंदुरबार व नवापूर, युवाशक्ती फाउंडेशन नाशिक, पिपल ट्री व्हेंचर्स प्रायव्हेट लिमीटेड पुणे, टाटा मोटर्स, नंदुरबार व डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा.लि., नाशिक, हे उद्योजक मेळाव्यात सहभागी होवून त्यांच्याकडील रिक्तपदे भरणार आहेत. या मेळाव्या लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी घ्यावा असे, आवाहनही सहायक आयुक्त रिसे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.