*11 व 12 जानेवारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा-संजय खडसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*11 व 12 जानेवारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा-संजय खडसे*
*11 व 12 जानेवारी विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा-संजय खडसे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-संचालक संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती मुंबई (DATSWA) अंतर्गत जिल्हा कोषागार कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत 11 व 12 जानेवारी, 2025 रोजी जिल्हा क्रिडा संकुल, नंदुरबार येथे विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या स्पर्धेत नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर व नंदुरबार जिल्ह्यातील कोषागार कार्यालयातील स्पर्धक अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार असून विभागीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा याप्रमाणे राहणार आहेत. शनिवार 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा क्रिडा संकुल नंदुरबार येथे मान्यवरांच्या हस्ते क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन व विविध स्पर्धा, रात्री 8 वाजता सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन व विविध सांस्कृतिक स्पर्धा. रविवार 12 जानेवारी 2025 रोजी दिवसभर विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, संध्याकाळी बक्षिस वितरण व समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. असेही जिल्हा कोषागार अधिकारी खडसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.