*रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरीय शिबिरे-सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरीय शिबिरे-सुंदरसिंग वसावे*
*रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरीय शिबिरे-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ग्रामीण भागात रमाई आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली.
शिबिरारांचे वेळापत्रक पंचायत समिती नंदुरबार गुरुवार 16 जानेवारी 2025, पंचायत समिती शहादा शुक्रवार 17 जानेवारी 2025,
पंचायत समिती अक्कलकुवा सोमवार 20 जानेवारी 2025, पंचायत समिती नवापूर मंगळवार 21 जानेवारी 2025,
पंचायत समिती तळोदा बुधवार 22 जानेवारी 2025, पंचायत समिती धडगाव गुरुवार 23 जानेवारी 2025, सर्व ठिकाणची शिबिरे सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 5 या वेळेत होतील.
योजनेंतर्गत लाभ
ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने ₹ 1, 20,000 अनुदान देण्यात येईल.
लाभार्थी पात्रता अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध संवर्गात मोडत असल्याचा जात प्रमाणपत्र महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी प्रमाणपत्र
वार्षिक उत्पन्न ₹ 1, 00,000 पेक्षा कमी असल्याचा उत्पन्न दाखला, घराच्या मालकीचा पुरावा (पी.आर. कार्ड, सातबारा उतारा इ.)
2023-24 आर्थिक वर्षापर्यंतचा कर भरण्याचा पुरावा, कच्च्या घराचा किंवा रिकामी जागेचा फोटो, यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा आधार कार्ड, लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र, रेशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे तपशील, महत्त्वाचे
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहून घरकुलाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.