*नंदुरबार पोलीस दलातर्फे रेझींग डे सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार पोलीस दलातर्फे रेझींग डे सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*नंदुरबार पोलीस दलातर्फे रेझींग डे सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-पोलीस स्थापना दिवसाच्या अनुषंगाने पोलीस दलातर्फे दरवर्षी 2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस रेझींग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने नंदुरबार शहरात व जिल्हयात नंदुरबार पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थांसाठी तालुका स्तरावर चित्रकला, वकृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थांसाठी आज 8 जानेवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे चित्रकला, वकृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी संबंधीत विषयातील तज्ञ अध्यापक यांना परिक्षक म्हणुन आमंत्रित करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थांना ट्रॉफी, प्रशिस्तीपत्र व पुस्तक असे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रवण दत्त.एस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिस्तीपत्र व पुस्तक प्रदान करण्यात आले असुन सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी अभिनंदन केले आहे.