*“भालेर औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार”-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*“भालेर औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार”-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*“भालेर औद्योगिक वसाहतीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार”-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनीधी):-भालेर औद्योगिक वसाहतीच्या विकासामुळे नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल” असे मत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी व्यक्त केले. त्यांनी भालेर औद्योगिक वसाहतीच्या जागेची पाहणी करून तेथील विकासासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. औद्योगिक वसाहतीसाठी पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. “भालेर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
*मूलभूत सोयी-सुविधा उभारण्यावर भर*
औद्योगिक वसाहतीचा विकास गतीमान करण्यासाठी पाणीपुरवठा, रस्ते, वीजपुरवठा यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देताना त्यांनी भालेर औद्योगिक वसाहतीच्या विकासामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून स्थानिक तरुणांना स्थिर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. औद्योगिक वसाहतीमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला. पाहणीवेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक दिगंबर पारधी, जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक दिपक सूर्यवंशी, तहसीलदार (नंदुरबार) मिलींद कुलथे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.