*राजापूर रोड व विलवडे रेल्वे स्टेशन येथे जादा रेल्वे थांबण्यासाठी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबईच्यावतीने आ. किरण सामंत यांच्याकडे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर रोड व विलवडे रेल्वे स्टेशन येथे जादा रेल्वे थांबण्यासाठी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबईच्यावतीने आ. किरण सामंत यांच्याकडे मागणी*
*राजापूर रोड व विलवडे रेल्वे स्टेशन येथे जादा रेल्वे थांबण्यासाठी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबईच्यावतीने आ. किरण सामंत यांच्याकडे मागणी* राजापूर(प्रतिनीधी):-कोकण रेल्वेच्या प्रकल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक म्हणजे 22% गुंतवणूक केली त्याच्या वाट्याला फक्त तीनच रेल्वे आल्या. त्यामुळेच प्रवाशांच्या तुलनेत ह्या मतदारसंघात रेल्वे मिळत नसल्याने चाकरमन्यांची प्रवासा दरम्याने मोठी गैरसोय होतेय, कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे व राजापूर रोड ही रेल्वे स्टेशनला दोन्ही तालुक्यातील बहुतेक गावे ही मुंबई ते राजापूर दरम्यानच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर अवलंबून आहेत, त्यामुळे राजापूर लांजा मतदारसंघातील ही दोन महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहेत. मात्र राजापूर रेल्वे स्टेशनचे वार्षिक उत्पन्न हे उल्लेखनिय आहे. तसेच तालुक्यात प्रसिद्ध राजापूरची गंगा, उन्हाळे गरम पाण्याचे झरे, राजापूरातील इंग्रजांची वखार, आडीवऱ्याचे महाकाली मंदिर, धुतपापेश्वर मंदिर ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे असून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अशा अनेक कारणामुळे येथे प्रवाशांची नेहमी मोठी वर्दळ असते. यासाठीच आम्हाला 16345 / 46 नेत्रावती एक्सप्रेस, 12051 / 52 जनशताब्दी एक्सप्रेस, 12133 / 34 मंगळूर एक्सप्रेस, 16337/ 38 ओखा एर्णाकुलम एक्सप्रेस, 19260 / 59 भावनगर कोचिवल्ली एक्सप्रेस, 16335 / 36 गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस, 11099 / 00 लोकमान्य टिळक मडगाव एक्सप्रेस, 22908 / 08 हाप्पा एक्सप्रेस या एक्सप्रेसना राजापूर रोड रेल्वे स्टेशन येथे अतिरिक्त थांबे मिळावेत, अशी स्थानिकांची मागील अनेक वर्षाची मागणी आहे.
विलवडे रेल्वे स्टेशनला राजापूर व लांजा तालुक्यातील साधारण 90 गावे संलग्न आहेत मात्र येथे सहाच रेल्वे थांबत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय निर्माण होत आहे. त्यामुळे येथे 10103/04 मांडवी एक्सप्रेस, 16345/46 नेत्रावती एक्सप्रेस, 12618/17 मंगला एक्सप्रेस, 12133 /34 मंगळूरू एक्सप्रेस, 16311 /12 गंगानगर कोचिवल्ली एक्सप्रेस ह्यांना जादाचे थांबे मिळावेत. तर आडवली रेल्वे स्टेशन येथे 20111/12 कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा मिळावा अशी नवनिर्वाचित आमदारांकडे मागणी करण्यात आली आहे. तसेच राजापूर रोड स्टेशन येथे पूर्ण वेळ PRS सुविधा मिळावी, राजापूर पोस्ट ऑफीस येथील PRS सुविधा पुर्ववत करावी व नियमीत रेल्वे गाड्यांचा आरक्षण कोटाही वाढवावा, येथे सरकता जिना, ATM ची सुविधा करावी तसेच राजापूर तालुक्यातील दुसरे महत्वाचे सौंदळ स्टेशन या रेल्वेस्टेशनवर 11003/ 04 तुतारी एक्सप्रेसला अतिरिक्त थांबा मिळावा, तालुक्यातील पूर्व विभागातील सर्व गावांना सौंदळ हे स्टेशन नजीक असल्याने स्टेशनवर सुलभ शौचालय, सुसज्ज तिकीट खिडकी, प्लाटफॉर्म, स्टेशन रस्ता,लाईट या मूलभूत गरजांची पुर्तता करावी,अशी प्रवासी संघटनेने मागणी केली आहे.
राजापूर रोड, विलवडे, आडवली व सौंदळ रेल्वे स्टेशन येथे अतिरीक्त रेल्वे गाडयांना थांबे मिळाल्यास राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील दळणवळणामध्ये भर पडून स्थानिक रोजगार व व्यवसायाला चालना मिळेल यासाठी शक्य झाल्यास प्रवासी संघटने समवेत कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घ्यावी असे अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर बागवे व सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले. यावेळी प्रवासी संघटनेचे जयवंत साठे, सौ. संजना पालव, यशवंत परब आदी उपस्थित होते.