*रमामाता महिला मंडळ पाचल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रमामाता महिला मंडळ पाचल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
*रमामाता महिला मंडळ पाचल यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
राजापूर(प्रतिनीधी):-स्त्रियांना व बहुजन समाजाला शिक्षणाची कवाडे खुली व्हावी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम आपल्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षण देऊन त्यांना भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून मान मिळवून दिला असे उद्गार पाचल बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केले ते आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून आपले ज्ञान वाढवणे गरजेचे आहे एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते हा आदर्श आपण सर्व महिलांनी घेतला पाहिजे असे ते पुढे म्हणाले, रमामाता महिला मंडळ पाचल यांनी आयोजित केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते पाचल श्रावस्ती नगर येथील रमामाता महिला मंडळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती लुंबिनी बुद्ध विहार श्रावस्ती नगर पाचल येथे आयोजित केली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ प्रीती प्रदीप जाधव यानी भूषविले प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला रमा माता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ प्रीती जाधव उपाध्यक्ष सौ विशाखा पाचलकर खजिनदार शैलजा जाधव सहसचिव सौ प्रज्ञा पांगरीकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर श्रावस्ती नगरातील विद्यार्थी कुमार सार्थक राहुल जाधव, दुरिता अमोल जाधव, वेदांशी अतुल जाधव, मयुरी मुकेश जाधव तसेच पाचल बौद्ध विकास मंडळाचे सरचिटणीस गौतम पांगरीकर खजिनदार नरेश पाचलकर, सौ गायकवाड, जागृती ग्राम संघाच्या सीआरपी सौ. विदिशा विनोद जाधव यांनी सुद्धा यावेळी आपली मनोगते व्यक्त केली जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पाचल बौद्धवाडी या शाळेची विद्यार्थिनी कुमारी रुंजी महादेव रोकडे जिल्हास्तरीय लंगडी संघामध्ये राजापूर तालुक्यातून निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला दिनेश शंकर जाधव, शैलेश आत्माराम जाधव, सौ. स्वराली उदय जाधव, सारिका मुकेश जाधव, आशा अशोक जाधव, सौ .प्रज्ञा प्रमोद जाधव, जयराज लक्ष्मण पांगरीकर प्रदीप नारायण जाधव, सौ. वनिता अमोल जाधव, सौ दिक्षा जाधव, सौ रक्षता दयानंद जाधवआदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमामाता महिला मंडळाच्या सहसचिव सौ प्रज्ञा गौतम पांगरीकर यांनी केले.