*डोंगरी पोलिस स्टेशन मार्फत रायझिंग डे निमित्त व्यसनमुक्तीचा संदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डोंगरी पोलिस स्टेशन मार्फत रायझिंग डे निमित्त व्यसनमुक्तीचा संदेश*
*डोंगरी पोलिस स्टेशन मार्फत रायझिंग डे निमित्त व्यसनमुक्तीचा संदेश*
मुंबई(प्रतिनीधी):-संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस दल रायझिंग डे साजरा करत आहे. डोंगरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्ना खंडेलवाल आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याचे कमिटी मेंबर बॉस्को डिसोझा आणि मुंबई शहर जिल्हा संघटक विवेक साळवी उपस्थित होते. डोंगरी विभागातील सेंट जोसेफ कॉन्व्हेन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बँड वाजवून रॅलीच्या स्वरुपात पोस्टर प्रदर्शन करून विभागात प्रचार केला, सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्ना खंडेलवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बॉस्को डिसोझा यांनी ड्रग्सचे व्यसन आणि समाजावर होणारे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. विवेक साळवी यांनी व्यसनमुक्ती पत्रक वाटप केले.