*दिपाली चित्ते खून प्रकरणात न्याय मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचा 10 जानेवारीला शहाद्यात जन आक्रोश मोर्चा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिपाली चित्ते खून प्रकरणात न्याय मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचा 10 जानेवारीला शहाद्यात जन आक्रोश मोर्चा*
*दिपाली चित्ते खून प्रकरणात न्याय मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचा 10 जानेवारीला शहाद्यात जन आक्रोश मोर्चा*
शहादा(प्रतिनिधी):-दिपाली सागर चित्ते/ कोळी हिला चाकूने हल्ला करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस तपासी अधिकारी व डाॅक्टर यांच्यावर गुन्हे दाखल करून सहआरोपी करा, सेवेतून काढा व कुलकर्णी हाॅस्पीटलची मान्यता रद्द करा, मागण्यांसाठी आदिवासी संघटनांचा 10 जानेवारीला सकाळी 11 वाजता शहादा येथे जन आक्रोश मोर्चा होणार आहे.याबाबत बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, दिपालीची आई ममताबाई, बहिण रूपाली पावरा,भाऊ दीपक पावरा, मामा बंटी पावरा,%सुरेश वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. दिपाली सागर चित्ते/ कोळी या आदिवासी महिलेला किरकोळ कारणावरून आरोपीत मुस्लीम हमीद कुरेशी, रिज्जू मुस्लीम कुरेशी, रूखसार राहणार सर्व अक्सा पार्क मलोनी ता.शहादा जि.नंदुरबार यांनी पोटात चाकू खुपसून जीवघेणा हल्ला केला होता,उपचार दरम्यान रूग्णालयात दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी दिपाली सागर चित्ते/ कोळी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर हल्ल्याचा आम्ही समस्त आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. दिपाली सागर चित्ते / कोळी यांनी दिलेल्या जवाबानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 कलम 11. 118(1), 352, 5 (3) गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलीसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल न केल्यामुळे आरोपींनी दिपालीवर जीवघेणा हल्ला करूनही कोर्टात जामीन मिळवला. त्यानंतर आदिवासी सामाजिक संघटनांनी दबाव निर्माण केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307 दाखल करून आरोपींना अटक केली. तक्रारदार महिला ही आदिवासी समाजाची महिला आहे व आरोपी हे मुस्लीम समाजाचे आहेत, हे माहीत असूनही आरोपीविरुद्ध ॲस्ट्रासिटीचा व विनयभंगाचा तसेच गंभीर दुखापत, जीव घेणा हल्ला संबंधित कलम पोलीसांनी लावले नाहीत.
तसेच आदिवासी महिलेला चाकूने गंभीर दुखापत होऊन, रक्तस्त्राव होऊन जखमेच्या ठिकाणी 3 टाके लागूनही सरकारी रूग्णालय शहादा व कुलकर्णी रूग्णालय शहादा येथील डाॅक्टरांनी आरोपींशी मॅनेज होऊन साधी दुखापत झाल्याचा खोटा अहवाल बनवून दिला. खून प्रकरणात दिपाली चित्ते/ कोळी हिच्यावर चाकूने हल्ला करणारे आरोपी जेवढे दोषी आहेत, तेवढेच दोषी आरोपींना वाचविण्यासाठी आरोपीविरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यास टाळाटाळ व दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी आणि आरोपींना वाचविण्यासाठी व प्रकरण दडपण्यासाठी डाॅक्टरांनी खोटा अहवाल बनवला म्हणून संबंधित डाॅक्टर सुद्धा तेवढेच दोषी आहेत. डाॅक्टरांनी योग्य उपचार करून सत्य अहवाल दिला असता तर दिपाली चित्ते / कोळी हिचा जीव वाचला असता. म्हणून दिपालीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने धर्म भेद, जातीभेद विसरून दिपालीला न्याय मिळावा, यासाठी एकत्र यावे असे जाहीर आवाहन बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी केले आहे.