*स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी–एम सावन कुमार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी–एम सावन कुमार*
*स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी–एम सावन कुमार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रामपंचायतीचा ओडीएफ प्लस मॉडेलचा दर्जा शाश्वत राहण्यासाठी तसेच ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेच्या सवयी अंगीकृत करणे, त्यासाठी कुटुंबाना प्रोत्साहीत करणेसाठी शासनातर्फे दि. 26 जानेवारीपर्यंत स्वच्छ माझे अंगण हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा 2 अंतर्गत कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वैयक्तिक शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा, परसबाग, पाझर खड्डा, घनकचरा व्यवस्थापना करिता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा तसेच कुटुंब स्तरावर कचराकुंड्या या बाबतची उपलब्धता करून घेतली, अशा कुटुंबांना प्रोत्साहन देत इतरही कुटुंबांनी त्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात सार्वजनिक स्तरावरील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाने पुढाकार घेणे, घरगुती स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा किंवा घरगुती खतखड्डा निर्मिती करून घराच्या परिसरात व्यवस्थापण करणे, परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्ड्याद्वारे घरगुतीस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनावर अभियानात विशेष भर देण्यात आला आहे. सर्व प्रथम अभियानाची माहिती दवंडी देऊन गावातील सुचना फलकांवर लावून गावात ग्रामस्थांना माहिती द्यायची आहे. त्यानंतर दिनांक 1 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत या अभियानाची अंमलबजावणी करायची आहे. दि. 21 ते 24 जानेवारी या कालावधीत पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मार्फत वैयक्तिक स्तरावर शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांची पडताळणी करून, कुटूंबांची निवड करायची आहे. ज्या कुटूंबाची निवड करावयाची आहे, त्यांच्याकडे किंवा परिसरात घरगुती खतखड्डा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा, पाझर खड्डा, वैयक्तिक शौचालय, घरगुती कचराकुंड्या आदी सुविधा असणे आवश्यक आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटंबांना दि. 26 जानेवारी 2025 ला ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र, श्रीफळ, पुष्प देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. 'स्वच्छ माझे अंगण अभियान' ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यासाठी सरपंच व ग्राम पंचायत अधिकारी, पदाधिकारी,विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी यांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, प्रकल्प संचालक विवेक गुंड यांनी केले आहे.