*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
*शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
नंदूरबार(प्रतिनीधी):-शा.ज. नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती पुनम बागुल यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांनी केलेले कार्य याविषयीचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार श्रीमती दिपिका गावित यांनी केले. बालिका दिनानिमित्त रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मिनल वसावे व बालमंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणाली बोरकर, तरुलता कुलकर्णी दिपाली पाटील, रंजीता वळवी, मोनिका नेरे, अंकिता पाटील, श्रीराम मगर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.