*ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा-एस. जी. तायडे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा-एस. जी. तायडे*
*ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांनी एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा-एस. जी. तायडे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांनी घतलेल्या कर्ज प्रकणातील संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबत सुधारीत एक रक्कम परतावा योजना राबविण्यात येत असून थकीत कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेवून थकीत कर्ज 31 मार्च, 2025 पर्यंत भरून कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. जी. तायडे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक 02564-210062 येथे संपर्क साधावा असेही जिल्हा व्यवस्थापक तायडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.