*न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
*न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
राजापूर(प्रतिनीधी):-जैतापूर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या भव्य रंगमंचावर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संयुक्त कार्यवाह व सीईओ जगदीश आडविरकर होते. प्रारंभी शाळेच्या आवारातील स्वयंभू गणेशाची पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन व रंगमंचावर श्रीफळ वाढवून विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या सुंदर रांगोळी प्रदर्शन व कला शिक्षक विजय कुणकवळेकर यांच्या उत्कृष्ट कलादालनचे उपस्थितांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सागरी पोलीस ठाणे नाटेचे पोलिस निरीक्षक श्री अश्वनाथ खेडकरसाहेब,
पोलीस फौजदार युवराज हुजरे व त्यांचे सहकारी यांनी भेट देऊन स्नेहसंमेलनाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापिका श्रीमती शुभांगी यादव व कार्यक्रम प्रमुख विजय कुणकवळेकर यांनी
केले. उपस्थितांचे स्वागत सौ. राजश्री राजगौडा नारे मुख्याध्यापिका यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त सुरेश पोवार, भिकाजी गिरकर, विकास मांजरेकर, दिवाकर आडविरकर, उद्योजक राजेश मेळेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ आराध्या प्रसाद मांजरेकर, पोलीस पाटील सौ.दीपा गणेश माजरेकर, सौ. व नार्वेकर गुरूजी, नारे गुरूजी दिगंबर शिवगण व मान्यवर उपस्थित होते.