*तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा विलवडे नंबर 1 चे सलग सुयश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा विलवडे नंबर 1 चे सलग सुयश*
*तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्रशाळा विलवडे नंबर 1 चे सलग सुयश*
लांजा(प्रतिनीधी):-शनिवार दि.4 जानेवारी 2025 रोजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा यांच्या मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत खो खो मोठा गट मुलगे यांनी नेत्रदीपक कामगिरी करत याही वर्षी विलवडे केंद्राचे नाव चषकावर कोरले. प्रथमदर्शनी अगदी छोटी छोटी वाटणारी मुले त्यांची चपळाई आणि कौशल्य पाहून प्रेक्षकांनी त्यांची वाहवा केली. विलवडे गावचे गावप्रमुख सुहासजी खामकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश बेर्डे व बहुसंख्या ग्रामस्थ, पालक व शिक्षण प्रेमी खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी मैदानात उपस्थित होते. याही वर्षी लांजा तालुक्याचे नेतृत्व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये करणार म्हणून या चिमुकल्यांचे विलवडे गावातील सर्व ग्रामस्थ व परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खो-खो लहान गट मुलगे यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले. शिरवली शाळेतीलही विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. विलवडे गावातील शिक्षणप्रेमी सुरज मोहिते यांनी अल्पावधीतच या विद्यार्थ्यांना खेळाचे किट मुंबईवरून पाठवून दिले. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दीपिका दिलीप कांबळे, प्रमोद तुकाराम कांबळे, पूनम अमित जाधव व नंदकुमार यशवंत गोतावडे यांचे मार्गदर्शन लाभले. सरावासाठी व विशेष कौशल्यासाठी ऋषभ नार्वेकर, अमेय कानसे व सौरभ नार्वेकर या माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. या सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पर्शुराम मासये यांनी विशेष अभिनंदन केले.