*सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न*
*सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न*
शहादा(प्रतिनीधी):-सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न. उंटावद तर्फे होळ येथील रोकडमल हनुमान मंदिराच्या परिसरातील सामाजिक सभागृहात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे दि. 6 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले असून या शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्रा. संजय जाधव, उद्घाटक म्हणून रोकडमल हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व पोलिस पाटील विजय पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव, उंटावद ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी महेश पाटील सामाजिक कार्यकर्ते लिमजी पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती एस.यू. अहिरराव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल साळुंके, प्रा. डॉ . प्रसन्ना डांगे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात येऊन उंटावदचे पोलिस पाटील, रोकडमल हनुमान ट्रस्ट मंदिराचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय जाधव यांनी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाशी नाळ जोडल्यामुळे राष्ट्रनिर्मितीच्या व देशसेवाच्या कार्यात सहभागी होण्याची मोलाची संधी मिळून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकास होण्यास मोलाची मदत होते, राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रक्रियेतून प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक मूल्य जपून देशसेवा केली पाहिजे, असा संदेश दिला. विजय पाटील यांनी, स्वयंसेविकांना राष्ट्रीय सेवा योजना हे समाजात प्रतिष्ठेने जीवन जगण्याचे शिक्षण देणारी सुसंस्काराची कार्यशाळा असून जबाबदारी बरोबर कर्तव्याची जाणीव करून देणारी शिदोरी असून प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी सर्वांगीण दृष्टीने स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे रा.से.यो.चे सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल साळुंके तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती एस. यू. अहिरराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.