*न्युक्लिअस बजेट योजनेसाठी 17 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत -चंद्रकांत पवार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न्युक्लिअस बजेट योजनेसाठी 17 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत -चंद्रकांत पवार*
*न्युक्लिअस बजेट योजनेसाठी 17 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत-चंद्रकांत पवार*
नंदुरबार(प्रतिनीधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना न्युक्लिअस बजेट योजनेतून लाभ देण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांनी 17 जानेवारी, 2025 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. वर्ष 2024 -25 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेत मानव साधन संपत्ती व आदिवासी कल्याणात्मक योजनेतून अनुसूचित जमातीचे वनपट्टेधारक शेतकरी व शासकीय आश्रमशाळेत जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी वन्य प्राणी पळविण्यासाठी लागणारे यंत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार (02564-210303) येथे 06 ते 17 जानेवारी, 2025 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वितरीत व स्विकारले जातील. दिलेल्या मुदतीनंतर (17 जानेवारी, 2025) अर्ज वितरीत अथवा स्विकारले जाणार नाहीत. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी विहीत नमुन्यातील अर्जासह जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, शेतीचा सातबारा किंवा वनपट्टे धारक असल्यास वन जमिनीचे प्रमाणपत्र, एक वर्षाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला, अलीकडील पासपोर्ट आकाराचा सुस्पष्ट एक फोटो, ग्रामसभेचा ठराव, यापूर्वी शासकीय/न्यूक्लिअस बजेट योजनेचा लाभ प्रकल्प कार्यालय/अन्य शासकीय विभागाकडून घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे अनिवार्य राहिल, असेही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पवार यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.