*श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन सेवेत सहभागी व्हा-नितीन मोरे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन सेवेत सहभागी व्हा-नितीन मोरे*
*श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन सेवेत सहभागी व्हा-नितीन मोरे*
नंदूरबार(प्रतिनीधी):-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिर्लिंग भूमी श्रीक्षेत्र घृष्णेश्वर, वेरूळ, संभाजीनगर येथे 21 जानेवारी रोजी श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच 6 ते 10 फेब्रुवारी नाशिक येथे होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवानिमित्त 1 ते 7 जानेवारी कृषी जनजागर सप्ताह सुरू करण्यात आला आहे. या सर्व सेवेत सेवेकरीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रतिपादन अखिल भारतीय स्वामी समर्थ बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीन मोरे यांनी नंदुरबार येथे केले. नंदुरबार येथील चौपाळे रोड वरील श्रीस्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्रात त्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
परमपूज्य गुरुमाऊलींनी यापूर्वीही अखिल सेवेकरी परिवारास सोबत घेऊन विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय सत्संग मेळावे आयोजित केले आहेत यामध्ये श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, माहूर, वनी, पावागड (गुजरात), पिठापूर, गाणगापूर, नृसिंहवाडी, भीमाशंकर शुकताल, नैमिषारण्य, काशी, उज्जैन, रामेश्वर, सन्नती अशा ऐतिहासिक सत्संग मेळाव्याचा समावेश आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मेळाव्यातून मानवी जीवन, सुखी, समाधानी, समृद्ध व्हावे तसेच या भारत राष्ट्राची प्रगती व्हावी या हेतूने लक्षचंडी, कोटीचंडी अशा ऐतिहासिक सेवा यशस्वीपणे पूर्ण करून आता अब्जचंडीकडे सुरू आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे अतिप्राचीन मंदिर असून 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक आहे. या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख शिवपुरान, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये, रामायण, स्कंदपुराणात व महाभारतात या ग्रंथात आढळतो. या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. या ज्योतिर्लिंगाला अंतिम ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाते. श्री क्षेत्र सनती नंतर प्रथमच भगवान श्री घृष्णेश्वराच्या पवित्र भूमीवर श्रीचक्रराज श्रीयंत्राचे पूजन करण्याची सुवर्णसंधी सेवेकरी ना लाभणार आहे. मानवी जीवनात "अर्थ व आरोग्य लाभणे ही महत्वाची बाब मानली जाते आणि आपण ज्याचे पूजन करणार आहोत ते श्रीचक्रराज श्रीयंत्र हे प्रामुख्याने "धनलक्ष्मी व आरोग्य लक्ष्मी" प्रदान करणारे आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वसामान्य सेवेकरी वर्गास उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी व मानवी जीवनातील सर्वांगीण समस्या दूर होऊन आयुष्य सुखी, समाधानी व्हावे या उद्देशाने या ऐतिहासिक सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रीचक्राराज श्रीयंत्र पूजनाने सेवेकऱ्यांच्या अध्यात्मिक उपासनेस जलद गतीने फलश्रुती प्राप्त होऊन मानवी समस्या-प्रश्न यांचे समूळ निवारण होते अशी त्याची फलश्रुती आहे.
परमपूज्य गुरुमाऊर्लीच्या पावन उपस्थितीत मंगळवार 21 जानेवारी 2025, रोजी श्रीघृष्णेश्वर येथील भूमीवर श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन व अतिरुद्र सेवा होणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्व साधकांनी, भक्तांनी व सेवेकरांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सानिध्यात संपन्न होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीन मोरे यांनी केले आहे.