*दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड हून संत नामदेव ग्रंथ दिंडी जाणार- पंढरीनाथ बोकारे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड हून संत नामदेव ग्रंथ दिंडी जाणार- पंढरीनाथ बोकारे*
*दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड हून संत नामदेव ग्रंथ दिंडी जाणार- पंढरीनाथ बोकारे*
नांदेड(प्रतिनीधी):–फेब्रुवारी 2025 मध्ये नवी दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नानक साई फाऊंडेशनच्या वतीने नांदेड ते दिल्ली (व्हाया आग्रा) अशी संत नामदेव ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले असून 17 फेब्रुवारी रोजी दिंडी नांदेड येथून रवाना होणार आहे. नानक साई फाऊंडेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे हे या ग्रंथयात्रेचे (दिंडी) नेतृत्व करणार आहेत. ग्रंथदिंडी व साहित्य संमेलनात राज्यातील मराठी साहित्यिक, साहित्यप्रेमीं आणि नामदेव भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21,22,23 फेब्रुवारी 2025 रोजी तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. खासदार शरद पवार हे स्वागत अध्यक्ष आहेत.
राजधानी दिल्लीत मराठीचा गजर, संस्कृतीचा साज आणि साहित्याचा महासागर फुलणार आहे. तब्बल 70 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. संत नामदेव महाराजांची कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे 2015 मध्ये झालेल्या 88 व्या मराठी साहित्य संमेलनानंतर आता 98 वे संमेलन महाराष्ट्राबाहेर दिल्लीत होत आहे. घुमान साहित्य संमेलनात ग्रंथयात्रा काढण्याचा मान नांदेड (हुजूर साहिब) येथील साहित्य-कला -संस्कृती -क्रीडा - सामाजिक -अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नानक साई फाऊंडेशनला मिळाला होता. घुमान साहित्य संमेलनातील 'संत नामदेव ग्रंथ दिंडी' खूप लोकप्रिय झाली होती. नानक साई फाऊंडेशनला पुन्हा एकदा दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी काढण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे व सरहद सोसायटीचे अध्यक्ष संजय नहार यांनी ग्रंथ दिंडीची घोषणा केली आहे.
संत नामदेव ग्रंथ दिंडी 17 फेब्रुवारी रोजी हजूर साहिब (नांदेड) येथून सुरू होईल आणि संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान नरसी नामदेव (हिंगोली), आग्रा, मथुरा, वृंदावन मार्गे 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पोहोचेल. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते खा शरद पवार यांच्या हस्ते दिंडी चे दिल्लीत स्वागत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. ग्रंथ यात्रा नवी दिल्लीत तीन दिवस मुक्कामी असणार आहे. पानिपत युद्धात शहीद झालेल्या मराठा वीरांचे वंशज दिंडीत सामील होणार आहेत. या ग्रंथदिंडी व साहित्य संमेलनात राज्यातील मराठी साहित्यिक, साहित्यप्रेमीं आणि नामदेव भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार व नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे (9823260073) यांनी केले आहे. 'साहित्य संमेलन हा भाषिक उत्सव, भाषेची जत्रा असते. हा उत्सव अधिक देखणा करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदरभाव असून, त्या दृष्टीने अखिल भारतीय साहित्य महामंडळ व सरहद्द संस्था कार्यरत आहे. दिल्ली येथे होणारे साहित्य संमेलन प्रयोगशीलता आणि नावीन्याचा वापर करून संयोजक संजय नहार आणि त्यांचे सहकारी अधिक देखणे करतील असा विश्वास बोकारे यांनी व्यक्त केला. चळवळीनंतरचे पहिले संमेलन'
साहित्य संमेलन हे असे व्यासपीठ आहे, जेथे महाराष्ट्राची व्यापक भूमिका मांडली जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर दिल्लीत होणारे हे पहिले संमेलन आहे.