*तलाठी पेसा भरतीची रिक्त पदे भरा-बिरसा फायटर्स*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तलाठी पेसा भरतीची रिक्त पदे भरा-बिरसा फायटर्स*
*तलाठी पेसा भरतीची रिक्त पदे भरा-बिरसा फायटर्स*
नंदूरबार(प्रतिनिधी):-तलाठी पेसा भरती 2023 मधील माजी सैनिक अंशकालीन व गैरहजर विद्यार्थी ज्या रिक्त जागा आहेत त्या सर्वसाधारणमध्ये कन्व्हर्ट करून मेरीटनुसार भरती करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले, गिरीजाबाई पटले, आट्या तडवी, उग्रावण्या पाडवी, राल्या वळवी, कालूसिंग वळवी, हाना पटले, वसंत भील, किसन रहासे, बाठ्या वळवी, जि-या डमलखे, मोत्या पाडवी, गोमा वसावे, जेल्या पटले, सिंगा वळवी, दिवाल्या वळवी, बाज्या भील, जयसिंग वसावे, रावल्या वळवी, ओल्या वळवी, बाज्या वसावे आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तलाठी पेसी भरती 2023 मध्ये एकूण 52 जागांपैकी फक्त मी 30 पदांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उर्वरित 22 पदे रिक्त आहेत. जिल्ह्य़ात रिक्त पदांमुळे अतिरिक्त पदभार हा कार्यरत तलाठी यांच्यावर पडत आहे. सन 2023 मध्ये झालेल्या पदभरतीत माजी सैनिक अंशकालीन व गैरहजर उमेदवारांमुळे 22 पदे रिक्त आहेत. म्हणून तलाठी पेसा अंतर्गत भरती 2023 मधील एकूण 52 पदांपैकी 22 पदांची पदभरती भरती करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून करण्यात आली आहे.