*आधारभुत दरानुसार व हमीभावानुसार धान्य खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ-आर.एस. इंगळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आधारभुत दरानुसार व हमीभावानुसार धान्य खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ-आर.एस. इंगळे*
*आधारभुत दरानुसार व हमीभावानुसार धान्य खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ-आर.एस. इंगळे*
नंदुरबार(प्रतिनीधी):-केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत सुरु असलेल्या धान्य खरेदी तसेच हमीभावाने भरडधान्य खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी आर.एस. इंगळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत सुरु असलेल्या मुंग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 6 जानेवारी, 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य ज्वारी, मका, बाजरी व रागी खरेदीसाठी BeAM पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने शेतकरी नोंदणीची मुदत आता 15 जानेवारी, 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ही आहेत नोंदणीची ठिकाणे. शेतकरी सहकारी संघ लि. नंदुरबार (मोबाईल क्रमांक 9763286860)
शहादा ता. सहकारी खरेदी विक्री संघ लि. शहादा (मोबाईल क्रमांक 7722014165)
सर्व शेतकरी बांधवानी दिलेल्या खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त नोंदणी करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा पणन अधिकारी इंगळे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.