*सुरक्षा रक्षक पदासाठी संपर्क साधावा-मेजर निलेश पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुरक्षा रक्षक पदासाठी संपर्क साधावा-मेजर निलेश पाटील*
*सुरक्षा रक्षक पदासाठी संपर्क साधावा-मेजर निलेश पाटील*
नंदुरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरक्षा रक्षकाच्या पुरुष व महिला पदे भरावयाचे असून या पदासाठी जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, अवलंबित यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लि. नाशिक यांनी कळविल्यानुसार नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुरुष- 04 व महिला-02 असे सुरक्षा रक्षकाचे पदे भरावयाचे आहेत. यासाठी जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, अवलंबित ज्यांच्याकडे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ लि. (एमइसीएसओ) यांच्याकडील सुरक्षा रक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र आहे अशा पात्र उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 10 जानेवारी,2025 पर्यंत 02562- 237264 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे मेजर डॉ. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.