*वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत, 6 व 7 जानेवारी रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन-ध. बा. वळवी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत, 6 व 7 जानेवारी रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन-ध. बा. वळवी*
*वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत, 6 व 7 जानेवारी रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन-ध. बा. वळवी*
नंदुरबार(प्रतिनीधी):-वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत जिल्हा ग्रंथालय कार्यालय, नंदुरबार येथे 6 व 7 जानेवारी, 2025 रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमार्तंगत नागरिकांना व विद्यार्थ्याना पुस्तके आणि वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी वाचक संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात सामुहिक वाचन, वाचन सवांद, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परिक्षण, आणि कथाकथन स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.