*कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शालेय लेखन साहित्याचे मोफत वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शालेय लेखन साहित्याचे मोफत वाटप*
*कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शालेय लेखन साहित्याचे मोफत वाटप*
नंदूरबार(प्रतिनीधी):-1 जानेवारी रोजी जि. प. मराठी मुलींची शाळा म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार येथे कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनतर्फे लेखन साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही, पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी यावेळी लेखन साहित्य मिळाल्याने आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर नूतन नववर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक गणेश वारुळे तर प्रमुख अतिथी म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे संस्थापक सुनील परदेशी, शहादा तालुका अध्यक्ष निलेश पाटील, जिल्हा सचिव विजय चव्हाण, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण जगदाळे, केंद्रप्रमुख पराग चव्हाण, पदोन्नती मुख्याध्यापक मंगेश पाटील, काशिनाथ पाटील, केंद्रमुख्याध्यापक पंडित रावताळे, मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे, इरेशा आजुरे, प्रशिक्षणार्थी ममता अहिरे, प्रियंका मोरे, मोना सोनवणे हे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, केंद्रप्रमुख पराग चव्हाण, पदोन्नती मुख्याध्यापक मंगेश पाटील, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण जगदाळे, मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे आदींनी आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र बैसाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन इरेशा आजुरे यांनी केले.