*सहकार महर्षी पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार शैक्षणिक सहल संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सहकार महर्षी पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार शैक्षणिक सहल संपन्न*
*सहकार महर्षी पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार शैक्षणिक सहल संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-हिरा प्रतिष्ठान संचालित, सहकार महर्षी पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबारची शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. सहलीसाठी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने 11 डिसेंबर ते 16 डिसेंबर शासकीय बसने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, अध्यात्मिक, भौगोलिक व भाषिक ज्ञान मिळावे याकरिता तसेच दैनंदिन रुटीन मधून मनोरंजनात्मकतेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. या शैक्षणिक सहलीत स्थळांना भेट देण्यात आली त्यात शिर्डी,
रांजणगाव, महागणपती,
मोरगांव मोरेश्वर गणपती, जेजुरी खंडोबा,
नारायणपूर
प्रति बालाजी,
कोल्हापूर लक्ष्मी मंदिर, क्युबा (शाहू महाराज) पॅलेस,
पन्हाळा गड
ज्योतिबा,
सिंधुदुर्ग किल्ला,
तारकरली बीच, मालवण बीच, कुंकणेश्वर
पावस
परशुराम मंदिर,
रत्नागिरी अरेवारी बीच,
गणपतीपुळे
मालगुंड कवी, केशवसुत स्मारक व जन्मस्थळ
रायगड किल्ला,
रोहा पाली बल्लाळेश्वर महड वरदविनायक,
कर्जत नंदुरबार. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांचे समाधी स्थळ व माता जिजाऊ यांचेही समाधी स्थळ विषयी माहिती देण्यात आली तसेच विविध किल्ले, तट त्यांची सुरक्षितता, शाहू महाराज यांचे रहिवासी स्थळ तसेच मालगुंड येथील कवी केशवसुत यांचे जन्मस्थळ व स्मारक अशा विविध स्थळांना भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी मालवण येथील तारकरली बीच वर बनाना व ॲप्पल रायडिंग, स्कुबा डायव्हिग तसेच प्यारा सेलिंग अशा विविध गेम्सचाही मनमुराद आनंद लुटला. अशा पद्धतीने सहल आनंदात व सुरक्षिततेने संपन्न झाली. सहलीचे संपूर्ण आयोजन ज्येष्ठ शिक्षक तथा सहल प्रमुख महेंद्र फटकाळ, श्रीम. चेतना चौधरी, अनिल चौधरी, विश्वास गायकवाड, श्रीम.उज्वला चौरे यांनी केले.