*सिदाजी आप्पांचे चांगभले"चा जयघोष, बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त गवळी समाजातर्फे उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सिदाजी आप्पांचे चांगभले"चा जयघोष, बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त गवळी समाजातर्फे उत्साहात साजरी*
*सिदाजी आप्पांचे चांगभले"चा जयघोष, बालब्रह्मचारी सिदाजीआप्पा देवर्षी जयंतीनिमित्त गवळी समाजातर्फे उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सिदाजी आप्पांचे चांगभले असा जयघोष करीत महिला पुरुष आणि युवक शोभायात्रेत सहभागी झाले होते. भाग्यनगर (हैदराबाद) येथील गादीपिठाचे उत्तराधिकारी चंद्रशेखर आप्पा देवर्षी विशेष अतिथी म्हणून नंदनगरीत दाखल झाले. सजविलेल्या रथा वरून वाजत गाजत सकाळी मिरवणुकीस प्रारंभ झाला. शोभायात्रा दरम्यान ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून सजावट करण्यात आली होती. पुष्पवृष्टीसह भाविकांनी रथावरील गुरुवर्य यांची आरती करीत औक्षण केले.
येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत, गुरुवर्य बाल ब्रह्मचारी परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांचा जयंती उत्सव आणि नंदुरबार येथील गवळी वाड्यातील मंदिराच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त बुधवार 1 जानेवारी रोजी शहरातील प्रमुख रस्त्यावर शोभायात्रेसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे गुरुवर्य परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांचे कर्नाटक राज्यात चिडगोपा येथे मंदिर आहे. याशिवाय हैदराबाद येथे देखील प्रमुख अधिष्ठान आहे. त्याच प्रमाणे एक जानेवारी 2024 रोजी नंदुरबार येथील गवळीवाडा येथे भव्य मंदिर उभारण्यात आले. सिदाजीआप्पा देवर्षी यांची जयंती तसेच मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सजविलेल्या रथावरून सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर पारंपरिक भक्ती गीतांनी मिरवणुकीस गवळीवाडा येथून प्रारंभ झाला. मिरवणूक बुधवार 1 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता गवळीवाडा, सिदाजीआप्पा नगर येथून प्रारंभ झाल्यानंतर कुंभारवाडा, मोठा मारुती मंदिर, देसाईपुरा, शक्ति सागर चौक, अमर टॉकीज, अमृत चौक, मंगळ बाजार, सुभाष चौक, जुनी नगर पालिका, आमदार कार्यालय, दीनदयाल चौक, स्टेट बँक, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरमार्गे गवळीवाडा येथे मिरवणुकीचा महाआरतीने समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत महिला आणि युवती यांनी फेटे परिधान करून सहभागी झाले. तर युवक आणि पुरुष मंडळींनी सिदाजी आप्पांचे चांगभले जयघोष असलेल्या पारंपारिक भगव्या टोप्या घातल्याने मिरवणुक लक्षवेधी ठरली. दरम्यान मिरवणूक आमदार कार्यालयाजवळ आल्यानंतर नगर पालिकेचे माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन ढोल ताशाच्या गजरात नाचण्याचा आनंद लुटला. तसेच हैदराबाद इथून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मिरवणुकी सांगता गवळी वाड्यात झाली.
यावेळी मंदिरातील परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांच्या संगमरवरी मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला.
हैदराबाद येथील चंद्रशेखरआप्पा देवर्षी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गा वरून निघालेल्या मिरवणुकी दरम्यान शहर पोलीस ठाणे तर्फे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तासाठी उपस्थित राहून सहकार्य केले. मिरवणूक यशस्वीतेसाठी
वीरशैव लिंगायत गवळी समाज पंच मंडळ आणि युवक कार्यकर्ते व संयोजकांनी परिश्रम घेतले.