*ओझर येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ओझर येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण*
*ओझर येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण*
राजापूर(प्रतिनीधी):- तालुक्यात मौजे ओझर गावातील गोसावी वाडी येथील श्रीमती प्रमिला प्रकाश गोसावी यांच्या घराच्या मागील पडवीत मंगळवार 31 डिसेंबर 2024 रोजी बिबट्या जातीचा वन्य प्राणी जख्मी अवस्थेत असल्याची खबर ग्रामस्थांनी राजापूर वनविभागाला दिली श्रीमती प्रमिला गोसावी या लाकडे जमवण्यासाठी गेल्या असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करुन कानाच्या बाजूला नखांनी ओरबडले आहे तेथून हा बिबट्या उठून अन्वर लांजेकर यांचे घराजवळ असलेल्या काजू कलमच्या बागेमध्ये गेला असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन वस्तुथितीची पाहणी केली तरी सदरचा बिबट्या हा गावामधील कच्च्या रस्त्यावर असणाऱ्या सिमेंटच्या पाईपच्या मोरीमध्ये जाऊन बसला होता ग्रामस्थांनी सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत या बिबट्यावर पाळत ठेवली व वनविभागाला त्याची माहिती दिली राजापूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात येऊन मोरीच्या पाईपला एका बाजूला लोखंडी जाळी लावून घेतली व दुसऱ्या बाजूला लोखंडी पिंजरा लावून त्याला पिंजऱ्या मध्ये घेतले तदनंतर बिबट्याला पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर यांचे कडून तपासणी करून घेतली असता तो जखमी अवस्थेत असल्याने बिबट्याला विभागीय वनधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील टी. टी. सी. सेंटर येथे पाठवण्यात येत आहे. सदर रेस्क्यूची कार्यवाही ही माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कामगिरीसाठी प्रकाश सुतार परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, जयराम बावधने वनपाल राजापूर, विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर, बाबासाहेब ढेकळे वनरक्षक लांजा, श्रीम. श्रावणी पवार वनरक्षक कोर्ले, प्रभू साबणे वनरक्षक रत्नागिरी, तसेच
रेस्क्यू टीमचे अनिकेत मोरे, किशोर गुरव, नितेश गुरव, प्रथमेश आखाडे तसेच गावातील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.