*सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर आयोजित रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर आयोजित रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*
*सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर आयोजित रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*
पुणे(प्रतिनीधी):-सालाबादप्रमाणे यंदाही सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर यांच्या वतीने रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक उपक्रमात एकूण 73 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्याचे काम केले या सामाजिक उपक्रमास सहयाद्री कुणबी संघ कार्याध्यक्ष गणपत दादा घडशी, प्रांत अध्यक्ष विलास घडशी, पुणे शहर अध्यक्ष सतीश डाकावे, पुणे शहर अध्यक्षा अंकिता शिगवण, पुणे जिल्हा अध्यक्ष नितिन अध्यक्ष, भा. ज. पा. पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, सा. कार्यकर्ते संतोष डोक, सा. कार्यकर्ते नितिन हनमगर, त्याचप्रमाणे सह्याद्री कुणबी संघांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ मांडवकर आणि संतोष रामाणे यांनी केले. रक्तदान हे सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेला ब्लड डोनेट करण्यात आले, तसेच सूर्या सह्याद्री हॉस्पिटल यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबवण्यात आले होते. सर्व रक्तदात्याना कै. अनंतराव भोज यांच्या स्मरणार्थ सौं. वैष्णवी भोज, प्रवीण भोज यांच्या कडून भेटवस्तू देण्यात आली. या उपक्रमास सर्व सहयाद्री कुणबी संघांच्या पदाधिकारी, पर्वती विभाग, कोथरूड विभाग, कात्रज विभाग, महिला आघाडी यांचे मोलचे सहकार्य लाभले.