*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन कोकणी मनोरंजनाच्या कार्यक्रमाने संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन कोकणी मनोरंजनाच्या कार्यक्रमाने संपन्न*
*मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन कोकणी मनोरंजनाच्या कार्यक्रमाने संपन्न*
मुंबई(प्रतिनीधी):-मुंबईमध्ये राहणाऱ्या चुनाकोळवणवासीयांचे स्नेहसंमेलन व अंबिकेश्र्वर प्रतिष्ठान गावस्तरावर राबवत असलेल्या विविध योजनांच्या निधी संकलनासाठी तुफानी विनोदी लोकनाट्य 'कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज' या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव नाट्यगृह, माटुंगा येथे करण्यात आले होते. पाचशेव्या प्रयोगांच्या दिशेने वाटचाल करताना कोकणचा साज संगमेश्र्वरी बाजच्या संपुर्ण टीमने बहारदार कार्यक्रम सादर केला. ग्रामीण भागातील पूर्वीची आपली लोककला तिचे शास्त्र कसे होते याबद्दल ग्रामीण बोली भाषेतून भाष्य करत संपूर्ण प्रेक्षक वर्गालाशेवटपर्यंत हसत खेळवत ठेवले. नाटक स्वरूपाच्या या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली कोकणातील कला संस्कृती पुढील पिढीने कशी जोपासावी व ती का जरुरी आहे? याबद्दलचे आवाहन फारच अप्रतिम पणे मांडले. मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानचे सामाजिक, कला/क्रीडा शैक्षणिक सास्कृतिक वैद्यकीय विकासात्मक उपक्रम गेले 16 वर्षे चालु आहेत मुंबईत राहून फक्त शिमगा- गणपतीसाठी गाव मर्यादित न ठेवता चुनाकोळवण गावचा सर्वांगीण विकास करायचा संकल्प चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानने केलेला आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या चुनाकोळवण गावात सवतकडा हे पर्यटन क्षेत्र प्रतिष्ठानने विकसित केले आहे. गावात उपलब्ध असलेल्या कोकम काजू नाचणी इत्यादी सारख्या पदार्थांचे उत्पन्न वाढवून लघु उद्योग उभा करून सवतकडा ब्रँड करून महिलांनाही रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. मुंबईस्थित नवीन पिढीचे नाते गावाशी जोडून गावच्या रूढी परंपरा संस्कृती टिकवण्यासाठी प्रतिष्ठान कार्यरत आहे गावे टिकली तर कोकणचे सौंदर्य टिकेल यासाठी चुनाकोळवण गावाला विकसित करण्यासाठी मौजे चुनाकोळवण अंबिकेश्र्वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते झटत आहेत असे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक उदय सावंत यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सांगितले
या कार्यक्रमासाठी मराठी सिनेसृष्टीतील सुशांत शेलार, शिवसेना राजापूरचे युवानेतृत्व अमेय विश्वासराव, गावप्रमुख मधुकर मटकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मटकर, सचिव प्रेमानंद मटकर, प्रतिष्ठान ग्रामीणचे प्रमुख मार्गदर्शक आणि दोन्ही ट्रस्टचे सचिव अनिल गुरव , युवा अध्यक्ष विनायक पळसमकर गावाहून खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले पोलीस पाटील संजय पाटणकर, शाखाप्रमुख यशवंत मटकर प्रमुख कार्यकर्ते सुरेश कांबळे बंटी गुरव तसेच राजापूर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी तसेच चूनाकोळवण गावचे संपूर्ण मुंबईस्थित ग्रामस्थ उपस्थित होते. बहुसंख्य ग्रामस्थांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला व प्रतिष्ठानला निधी संकलनासाठी मदत केली.