*वडवली ग्रामविकास मंडळ मुंबईचा 29 रोजी हिरक महोत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वडवली ग्रामविकास मंडळ मुंबईचा 29 रोजी हिरक महोत्सव*
*वडवली ग्रामविकास मंडळ मुंबईचा 29 रोजी हिरक महोत्सव*
राजापूर(प्रतिनीधी):-वडवली ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने रविवार 29 डिसेंबर रोजी हिरक महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे या समारंभाच्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वडवली ग्रामविकास मंडळ मुंबई ही वडवली गाव व परिसरातील सामाजिक, शैक्षणिक सर्वांगिण विकास साधण्यासाठी सन 1964 मध्ये स्थापन झाली सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असल्यामुळे वडवली पंचक्रोशीत या मंडळाला लौकिक व प्रतिष्ठा
प्राप्त झाली.या मंडळाने 60 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यामुळे रविवार 29 रोजी हिरक महोत्सव सोहळा आयोजित केला आहे हा सोहळा मंडळाचे विद्यमान सल्लागार, विद्यमान कार्याध्यक्ष, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ वडवली व राजापूर - लांजा तालुका नागरिक संघाचे माजी अध्यक्ष तुकाराम महादेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी गटविकास अधिकारी सुहास शरद पंडित आरडीसी बँक राजापूरचे सरव्यवस्थापक संजय बाकाळकर उपस्थित राहणार आहेत. शनिवार 28 रोजी सकाळी 9 वा. कार्यक्रमाचे उद्घाटन विविध फनी गेम्स, भेटवस्तू वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच 29 रोजी स. 10 वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, महाप्रसाद, संगीत खुर्ची, हळदीकुंकू तसेच वडवली ग्रामस्थांचे प्रासादिक भजन, रात्री 8.30 वा. दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत, सत्कारमूर्तींचा सत्कार बक्षीस वितरण, पुस्तक प्रकाशन, मान्यवरांची भाषणे, व रात्री 10 वाजता श्रीदेवी वाघजाई नाट्यमंडळ ओझरेखुर्द देवरुख यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे.