*चोरी गेलेल्या अजुन 13 मोटारसायकली हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा यशस्वी कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चोरी गेलेल्या अजुन 13 मोटारसायकली हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा यशस्वी कामगिरी*
*चोरी गेलेल्या अजुन 13 मोटारसायकली हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची पुन्हा यशस्वी कामगिरी*
नंदूरबार(प्रतिनीधी):-तळोदा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी रविंद्र मधु ठाकरे यांची बजाज कंपनीची मोटर सायकल ही उमरी ता. तळोदा येथील फिर्यादीचे घरासमोरुन चोरी झालेबाबतची फिर्यादवरुन तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञ ताविरुध्द भा. द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदामार्फत बातमी मिळाली की, तळोदा शहरातील कॉलेज चौफुली परिसरात दोन इसम विना क्रमांकाचे दुचाकी मोटारसायकल विक्री करण्याचे उददेशाने फिरत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथकास खात्री करुन कारवाई करणेकामी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीनुसार तळोदा शहरातील कॉलेज परिसरात संशयित इसमांचा शोध घेतला असता ते विना क्रमांकाचे वाहनासह तळोदा चौफुली जवळ दिसुन आले. सदर इसमांना दुचाकीसह ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश मिळाले, ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी दिलवरसिंग ऊर्फ कुव-या अहमदभाई वसावा, वय 22, रा. करताल पोस्ट दाबान ता. डेडीयापाडा जि.नर्मदा गुजरात, शिवदास ऊर्फ भाया कुवरसिंग पाडवी, वय 26, रा. रोझवा, ता. तळोदा, जि. नंदुरबार असे सांगितले. सदर इसमांना त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस केली असता त्यांनी मोटारसायकली तळोदा व बडवाणी येथुन चोरी केले असल्याचे सांगितले, त्याबाबत पोलीस पथकाने संबंधित पोलीस ठाण्याकडुन माहिती घेऊन सदर वाहने चोरीचे असल्याबाबत खात्री केली. तसेच सदर इसमांकडे अजुन काही चोरीच्या मोटारसाकलीबाबत विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी मागील दोन ते तीन वर्षात नंदुरबार तसेच बाहेरील जिल्हयातुन काही मोटारसायकली चोरी केले असल्याची माहिती दिली. सदर इसमांनी चोरी केलेल्या एकुण 5,70,000 रु. किमतीच्या 13 मोटारसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकों/मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, पोना/मोहन ढमढेरे, पोकों/विजय ढीवरे, दिपक न्हावी यांनी केली आहे.