*नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गावकारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण, पंचायत से पार्लमेंट, कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपती दौपदि मुर्मु करणार मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गावकारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण, पंचायत से पार्लमेंट, कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपती दौपदि मुर्मु करणार मार्गदर्शन*
*नंदूरबार जिल्ह्यातील दोन महिला सरपंच गावकारभारणींना संसदभवनाचे निमंत्रण, पंचायत से पार्लमेंट, कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपती दौपदि मुर्मु करणार मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय महिला आयोगांतर्गत दि.6 जानेवारी 2025 रोजी "पंचायत से पार्लर्मेंट" या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले असून महाराष्ट्र राज्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर संस्था यशवंतराव चव्हाण प्रशासन व विकास प्रबोधिनी, यशदा, पुणे यांचे कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार जि.प. नंदूरबार ग्रामपंचायत विभातून नंदूरबार जिल्ह्यात अनु. जमातीतील ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंच यातून आदर्शगाव पुरस्कार प्राप्त सौ.मनिषा विलास पाडवी, ग्रा. पं, सिसा ता.धडगाव जि. नंदूरबार व ग्रामपंचायत कारभारात सुसुत्रचा व नियोजनबध्द कामकाजा नोंद प्रभावी ग्रामप्रशासन चालवि-या सौ. अनिता आनंद नाईक, ग्रा.पं.नगारे, ता.नवापूर जि. नंदूरबार या दोन महिला सरपंच यांची निवड केली असूनयाकरीता यशदा पुणेचे सुधांशु महासंचालक, डाँ. मल्लिनाथ कलशेट्टी उपमहासंचालक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
राज्यभरातून "पंचायत से पार्लमेंट" सदर कार्यक्रमास आमंत्रित महिला सरपंच यांस शासकीय पाहुणचार व देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या महिला नेतृत्व राष्ट्रपती महोदयांसमवेत संवाद व भेट होऊन मार्गदर्शन लाभणार आहे. ग्रामपंचायत कारभार चालवितांना सरपंच या पदाची जबाबदारी सांभाळणे करीता स्वतहा आपण पदावर असतांना कारभार आपण सक्षम पणे चालवला पाहिजे असे मत सौ.मनिषा विलास पाडवी सरपंच सासा ता.धडगाव जि. नंदूरबार यांनी मांडले तर उत्तम प्रशासन चालवणेसाठी माहिला सरपंच म्हणून आपलेकडे आपल्या ग्रामपंचायत स्तरावरीर सर्व बाबी व घटकांची नोंद माहिती असयला हवी व प्रभावी नियोजन असायला हवे असे मत सौ. अनिता आनंद नाईक सरपंच नगारे ता. नवापूर जि. नंदूरबार यांनी मांडले. "पंचायत से पार्लमेंट" याप्रवासासाठी दोनही सरपंच यांस शुभेच्छा सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदूरबार, कुसुरकर, जयंत उगले ग्रामपंचायत विभाग जि.प. नंदूरबार यंत्रणेकडून लाभल्या.