*नंदुरबारध्ये नाताळनिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारध्ये नाताळनिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*नंदुरबारध्ये नाताळनिमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनीधी):-जगाला शांती आणि प्रेमाच्या संदेश देणारे येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन व नाताळनिमित्त येथील चर्चमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न. यावेळी देशात शांतता नांदावी यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. येथील सिंधी कॉलनी परिसरातील मिशन कंपाऊंड मध्ये असलेल्या सुवार्ता अलायन्स चर्च मार्फत नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजता ख्रिस्ती बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी मेणबत्ती प्रज्वलित करून नाताळ सण साजरा करण्यात आला. तसेच भक्तीपर गीत सादर केली. यावेळी सदर कार्यक्रम डॉ. राजेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मंडळीचे अध्यक्ष अनुप वळवी यांनी प्रवचन केले व जन्मदिनाच्या तसेच नाताळाचे महत्व सांगितले. सामूहिक प्रार्थनेत डॉ ग्लॅडविन जयकर, जे एच पठारे, एल पी वळवी, सॅमसंग जयकर, लोंढे, राजीव मार्गे यांनी प्रार्थनेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका तथा मिशन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नूतनवर्षा वळवी, दिलीप नाईक, लता कालू, प्रेमानंद लवणे, मार्था सुतार, सुरेश जांभीलसा, सॅबस्टिन जयकर, सत्यजित नाईक, राजेंद्र व्यास, संदेश यंगड, डॉ राजेश वसावे, कुसुम व्यास, कांताक्का, हर्षानंद कालू, नंदा नाठार यांच्यासह पंच व समाज बांधव उपस्थित होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात आनंद मेळावा, संडे स्कूल, तरुण संघ, सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.