*नंदुरबार येथील समस्त आदिवासी पावरा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व स्नेहसंमेलन संपन्न* .
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथील समस्त आदिवासी पावरा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व स्नेहसंमेलन संपन्न* .
*नंदुरबार येथील समस्त आदिवासी पावरा समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार व स्नेहसंमेलन संपन्न*
नंदुरबार(प्रतिनीधी):- समस्त आदिवासी
पावरा समाज मंडळ नंदुरबार मार्फत नंदुरबारच्या परिसरातील पावरा समाजातील विध्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व वार्षिक सेन्हसंमेलन कार्यक्रम देवमोगरा माता मंदिरात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ऍड.गोवाल पाडवी, आर्णी यवतमाळला सेवा देत असलेले उपजिल्हाधिरी डॉ. अर्जुन पावरा, मा. जि. प सदस्य तथा डीडीसी बँक संचालक हारसिंग पावरा, मोहन शेल्टे सेवानिवृत्त उपायुक्त, चामसिंग पावरा सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, उपपोलीस निरीक्षक कैलास पावरा लाभले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उत्तम पावरा होते. यावेळी मंडळातर्फे प्रथम कार्य गौरव युवा पुरस्कार म्हणून लोणखेड्याचे विद्याश्रम अकॅडमीचे संचालक दिनेश पावरा यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी ऍड. गोवाल पाडवी, उपजिल्हाधिकारी अर्जुन पावरा, हारसिंग पावरा, प्रा. दिनेश पावरा,उत्तम पावरा यांनी उपस्थित विदयार्थी पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी धडगाव बिलगावच्या आदिवासी संस्कृतीतील ढोल, मांदल, पेपाऱ्या, ढोलकीच्या तालावर पावरा समाज संस्कृतीच्या नृत्यावर नाचण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पावरा समाजातील महिला आदिवासी पावरा पेहरावात मोठया प्रमाणात उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष डॉ.रणजित पावरा, उपाध्यक्ष दिपक पावरा,प्रा.सरदार पावरा, डॉ.मनोज पावरा, डॉ. किसन पावरा, डॉ.संजय पटले, प्रकाश पावरा प्रा.भिमसिंग चव्हाण, तमन्ना भंडारी, इंजि. सायसिंग पावरा, राकेश पावरा, प्रविण पावरा, किसन पावरा, अनिता पटले, लता पावरा, प्रताप पावरा, सुभाष पावरा, डॉ.मंगलसिंग पावरा, अशोक
आप्पा, रमेश आप्पा, विजय पावरा, हर्षल पावरा, इंजि. किशोर पावरा, डॉ. रविंद्र पावरा, हारसिंग, देवा पावरा, संदीप पावरा, कांतीलाल पावरा, डॉ.श्रीकांत पावरा,शिलेंद्र पावरा, प्रताप पावरा, दिलीप पावरा, इंदास पावरा, कुमाऱ्या पावरा,जयसिंग पावरा, डॉ.विरेंद्र पावरा, सुभाष पोलीस, धानसिंग पावरा, गुलाबसिंग पोलीससह आदी उपस्थित होते.