*कळसवली ग्रंथालय आयोजित कथाकथन स्पर्धेत लांजा तालुक्याची बाजी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कळसवली ग्रंथालय आयोजित कथाकथन स्पर्धेत लांजा तालुक्याची बाजी*
*कळसवली ग्रंथालय आयोजित कथाकथन स्पर्धेत लांजा तालुक्याची बाजी*
राजापूर(प्रतिनीधी):-साने गुरुजी ग्रंथालय वडवली, कोकण मराठी साहित्य परिषद राजापूर, ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ ओणी व लोकमान्य शिक्षण मंडळ वडवली, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकथन स्पर्धेत या स्पर्धेत लांजा, राजापूर तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्याच्या उद्घाटनाला ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेच्या निमित्ताने लोकमान्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यवाह शरद साखळकर यांच्या हस्ते उद्घाटक वासुदेव तुळसणकर, प्रमुख पाहुणे हरिश्चंद्र गीते लेखक, सामाजिक कार्यकर्ते व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत, सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सर्व संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. खास मुंबईतून आलेले प्रदीप संसारे, अरविंद गोसावी, महादेव धुर्ये, गणपत भारती, संजय सावंत, प्रमोद लिमये, प्रकाश साखळकर, विलास शिंदे व सहकारी शिक्षक उपस्थित होते. ही स्पर्धा मोठ्या उत्साहाने आयोजित करून यशस्वी करण्यासाठी साने गुरूजी ग्रंथालयाचे अध्यक्ष भाई साखळकर व वडवली हायस्कूल मधील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे.
लांजा, राजापूर तालुक्यातील लहान चिमुकल्या मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या मान्यवरांनी उपलब्ध करून दिले आहे.
इयत्ता 8 वी ते 10 गटात या स्पर्धेत प्रथम क्र कुमार अभिनव कांबळे कुमार द्वितीय शुभम नाटेकर, कुमारी अनुश्री शेलार, तृतीय कुमारी स्वानंदी शेडेकर
ोइयत्ता 5 वी ते 7 वी गटात प्रथम क्रमांक कुमारी आरोही फडतरे, द्वितीय वृंदा कोतापकर तृतीय कुमारी राजकुंवर किल्लेदार तृतीय क्रमांक कुमारी पायल आमटे हे सर्व विदयार्थी यशस्वी झाले. या विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, व श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात आले. प्रमुख अतिथी यांनी उद्याचा भारत घडवणारी पिढी घडविण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात कारण यातच उद्याचे भविष्य घडणार आहे हा आशावाद व्यक्त करून संयोजक, सहभागी स्पर्धक, मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे कौतुक व अभिनंदन केले. यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांना धन्यवाद देताना तुळसणकर साहेबांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विलास शिंदे यांनी मानले.