*भिमाद्री विद्यालयात भव्य शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भिमाद्री विद्यालयात भव्य शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन*
*भिमाद्री विद्यालयात भव्य शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन*
कर्जत(प्रतिनीधी):-कर्जत येथील झेप प्रतिष्ठानच्या दत्तक भिमाद्री विद्यालयात नुकताच क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात मुला- मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आणि आपल्या क्रीडांगणातील कौशल्याने सर्वांचे मन जिंकले. क्रीडा महोत्सव हे केवळ खेळाचे मैदान नसून, विद्यार्थी जीवनातील शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. खेळामुळे फक्त शरीर निरोगी राहते असे नाही, तर शिस्त, सहकार्याची भावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण होतो. भिमाद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे सर्व गुण आत्मसात करत आपली क्षमता सिध्द केली. या महोत्सवात विविध प्रकारचे खेळांचे आयोजन करण्यात आले होते–कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी आणि बरेच काही. विद्यार्थ्यांचा जोम, त्यांचा उत्साह आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून पालक आणि शिक्षकांनाही अभिमान वाटला. खेळामुळे मुलांमध्ये तणाव व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टिकोन आणि मैत्रीचा नवीन दृष्टिकोन विकसित होतो. या महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये सुदृढ शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया घातला आहे.