*एकलव्य विद्यालयात श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा*
*एकलव्य विद्यालयात श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा*
नंदूरबार(प्रतिनीधी):-राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विद्यालयात गणित विषयाची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सदर प्रश्नमंजुषेसाठी विद्यालयात प्राथमिक गट (इयत्ता 5 वी ते 7 वी) व माध्यमिक गट (इयत्ता 8 वी ते 12 वी) अशा दोन स्तरावर स्पर्धा घेण्यात आली. सदर गटासाठी एकूण पाच ग्रुप तयार करून त्यांची स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक ग्रुपला भारतीय गणितज्ञ यांची नावे देण्यात आली. प्रत्येक गटासाठी ही स्पर्धा एकूण तीन फेऱ्यांमध्ये करण्यात येऊन त्यातील विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. प्राथमिक गटासाठी एकूण 20 विद्यार्थी व माध्यमिक गटासाठी एकूण 20 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक गटातून विजयी होणाऱ्या संघात निर्मिष अतुल अग्निहोत्री,
वैभव विजय पाडवी,
मयुरेश विनोद घुगे,
क्षितीज दिनेश पवार
तर माध्यमिक गटातील विजय संघात
ललित विनायक माळी, यश सुनील अहिरे, विनय मनोहर पिंपळे, प्रीतम प्रवीण पाटील
हे विद्यार्थी अंतिम फेरीत विजयी झाले.
सदर कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, उपमुख्याध्यापिका शैलजा कापडिया, संस्थेचे गणित विभागाचे प्रमुख धर्मेंद्र मराठे, विद्यालयाचे गणित विभागाचे प्रमुख कल्पेश तांबोळी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी प्राथमिक गटासाठी नितीन पाटील, सुयोग शिंपी व माध्यमिक गटासाठी विश्वास जठार, राहुल भावसार यांनी स्पर्धा घेतली. स्पर्धेचे गुणांकन जकु गावित व राजेश वळवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री खैरनार यांनी केले. व आभार अकीब अन्सारी यांनी केले.