*कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव देण्याची अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव देण्याची अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव देण्याची अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
मुंबई(प्रतिनीधी):-कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या निर्मितीच्या वेळी सर्वाधिक म्हणजे 22% गुंतवणूक ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्याने त्याची देखभाल, दुरुस्ती व प्रस्थावित कामे निधीअभावी मागील 25 वर्षांपासून रखडलेली आहेत, परिणामी महाराष्ट्र राज्याच्या वाटयाला तुतारी एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्सप्रेस व दिवा रत्नागिरी पॅसेंजर अशा तीनच रेल्वे मिळाल्या. प्रवाशांना योग्य सेवा मिळत नाहीत किंवा त्यामध्ये अडथळे येत आहे, त्यामुळेच कोकण रेल्वेच्या 25 वर्षानंतरही विकासाला मर्यादा येत आहेत. यासाठीच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून त्यातील महाराष्ट्रातील रोहा ते मडूरा दरम्यानचा भाग मध्य रेल्वेमध्ये समाविष्ठ करावा व सावंतवाडी टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे असा चालू हिवाळी अधिवेशनामध्ये ठराव पारित करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात कोकण रेल्वेचा समावेश होत नसल्याने निधी अभावी कोकण रेल्वेतील पायाभूत सुविधांच्या विकास कामांना खिळ बसलेली आहे. कोकण रेल्वे मार्गावर भारतीय रेल्वेपेक्षा प्रवासी वहातुकीवर 40% तर मालवहातुकीवर 50% जास्तीचा अधिभार लावलेला आहे. जास्त प्रवासभाडे देऊनही प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. कोकण रेल्वे मार्गावर निधी अभावी कोकण रेल्वेचे दुहेरीकरण, सावंतवाडी रोड टर्मिनस, संपुर्ण प्लाटफॉर्मवर शेड, सरकता जिना,रेल्वे ब्रीज, पिण्याचे पाणी, प्लाटफॉर्मची उंची, इंडीकेटर अशी अनेक कामे मागील 25 वर्षापासून रखडलेली आहेत. याचा परिणाम कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने मागणी करूनही कोकण रेल्वे मार्गावर कोकणवासियांना जादाच्या रेल्वे मिळत नाहीत.
सध्या कोकण रेल्वेवर 6 हजार कोटींचे कर्ज आहे, त्यामुळेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण झाल्यास रखडलेल्या कामांसाठी निधी मंजूर करून ती लवकरात लवकर केली जातील, त्याच्याने अत्यंत महत्वाचा सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्नही मार्गी लागेल तसेच येथे नवीन रेल्वे गाड्याही वाढवता येतील. कोकण रेल्वेच्या विलीनीकरणा संदर्भात गोवा व केरळ राज्यांप्रमाणे आपणही विधिमंडळात तसा ठराव पारित करून महाराष्ट्र शासनाची 22% गुंतवणूक ही केंद्र सरकारला हस्तांतरित करावी तसेच कोकण रेल्वेचा महाराष्ट्रातील रोहा ते मडूरा दरम्यानचा भाग हा भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी आपण केंद्राकडे शिफारस करावी, अशीही निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष, मंत्री उदय सामंत व नितेश राणे यांना पाठवल्याचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले.