*गुहागरमधील शीर धारेवरची डावलवाडीमध्ये एकजुटीने उभारली पाण्याची टाकी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गुहागरमधील शीर धारेवरची डावलवाडीमध्ये एकजुटीने उभारली पाण्याची टाकी*
*गुहागरमधील शीर धारेवरची डावलवाडीमध्ये एकजुटीने उभारली पाण्याची टाकी*
गुहागर(प्रतिनीधी):-कोकण तसं निसर्गानं नटलेला आणि समृद्ध असा आहेच परंतु काही ठिकाणी उन्हाळ्यात पाण्यासारख्या भीषण समस्येला तोंड द्यावं लागतं. बऱ्याच ठिकाणी विहरी, बोरवेल व नदी अशा प्रकारच्या पाण्याचा वापर होतो. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये वसलेलं अतिषय सुंदर शीर हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. हया गावात गावातच उगम पावणारी आणि बारमाही वाहणारी नदी आहे. गावातील बरीचशी वस्ती नदीपासून उंच भागावर आहे. अशीच एक वाडी म्हणजे धारेवरची डावलवाडी. हया वाडीला पाण्याच्या स्वरूपात निसर्गानं दिलेलं देणं आहे. वर्षभरातील जून ते मार्च पर्यंत डोंगरातून येणाऱ्या झऱ्याच्या माध्यमातून पाणी वाडी मध्ये येत असतं यासाठी कोणात्याही तांत्रिक उपकरणाची गरज भासत नाही. तसेच पुढील 3 महिने हे मात्र खूप त्रासदायक असतात हया दरम्यान नदीकाटच्या विहिरीतून पाणी वाडीपर्यंत विद्युत पंपाद्वारे आणलं जातं. हया दोन्ही ठिकाणच्या पाण्याचा साठा करण्यासाठी वाडीमध्ये स्वखर्चातून टाकी घेतली होती अनेक वर्षानंतर ती टाकी अचानक फुटली आणि वाडीतील ग्रामस्थांना एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. अशातच वाडीतील सर्वांच्या एकजुटीने आणि अनेक दानशूरांच्या मदतीने कोणतीही राजकीय मदत न घेता टाकी उभारण्याचं काम येथील नवजीवन विकास मंडळाने हाती घेतलं. मुंबईत राहून देखील आपल्या वाडीवर ओढवलेल्या या समस्येचा सामना करण्यासाठी सर्वजण गावी उतरले आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यतून मिळालेल्या आर्थिक मदतीने टाकी उभारण्यासाठी सर्वांनी श्रमदान केलं आणि एका मोठ्या संकटाला एकजुटीने कोणतीही राजकीय आर्थिक मदत न घेता सामोरे गेले. आणि पाण्याच्या साठा करणारी एक सुबक अशी टाकी बांधली. टाकीचं थोडं कामं बाकी असून मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे.
ह्या जीवनदान देणाऱ्या पाण्यासारख्या संकटावर मात करण्यासाठी ज्या ज्या दानशूरानी मदतीचा हात दिला त्या सर्वांचे नवजीवन विकास मंडळ आणि वाडीतील ग्रामस्थ आभार मानत आहेत.